दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण – आयुषी सिंह

105

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण – आयुषी सिंह

हिवताप चाचणी प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन

 

गडचिरोली,दि.14 (S Bharat news ): हिवताप प्रतिबंध विशेष कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकाऱ्यांकरिता मलेरिया मायक्रोस्कोपी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते व आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. श्याम निमगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल करण्यात आले. आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण असून त्यामुळे हिवताप आजाराचे त्वरित निदान व त्वरित उपचार करणे सोइचे होईल, असे श्रीमती आयुषी सिंह यांनी सांगितले.

 

राष्ट्रीय मलेरिया अनुसंधान संस्थान, दिल्ली यांचेतर्फे श्री. साई इंन्स्टीटयूड ऑफ नर्सिंग मेडिकल सायन्स गडचिरोली येथे दिनांक 13 मे ते 18 मे 2024 पर्यत प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे. प्रशिक्षणात हिवतापाची लागण झालेल्या रुग्णावर योग्य उपचार करण्यासाठी रक्ताची चाचणी करून हिवतापाचे परजीवी व त्यांचे प्रजाती निश्चित करणे, हिवतापाचे परजीवी मानवी शरीरातील विकासाचे टप्पे व त्यांचे जीवनचक्र तसेच हिवतापाचे जलद निदान व आर.डी.के. चाचन्यांची गुणवत्ता याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मुलभूत प्रशिक्षण प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकारी यांना दिले जाणार आहे.

 

प्रशिक्षण सत्र शुभारंभप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. लोकेशकुमार कोटवार,केंद्र स्तरीय प्रशिक्षक श्री. नसीम,टेकनिकल ऑफिसर, श्री. हरीओम,टेकनिकलअसिस्टंट राष्ट्रीय मलेरिया अनुसंधान संस्थान, दिल्ली,राज्य स्तरीय प्रशिक्षक डॉ. संजय कार्लेकर, कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ, श्री. भास्कर सूर्यवंशी, श्री. कृष्णा अवधूत, आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर, श्री. सचिन डोंगरे, प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकारी, हिवताप कार्यालय अकोला उपस्थित होते.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here