गडचिरोलीच्या पर्यटनाला नवी दिशा : जिल्हा प्रशासन, गडचिरोली व सोबाय टुरिझम एलएलपी (ट्रायबी टुर्स) यांच्यात सामंजस्य करार

206

गडचिरोलीच्या पर्यटनाला नवी दिशा : जिल्हा प्रशासन, गडचिरोली व सोबाय टुरिझम एलएलपी (ट्रायबी टुर्स) यांच्यात सामंजस्य करार गडचिरोली

रत्ना गेडाम उपसंपादक

गडचिरोली :- 18ऑगस्ट जिल्ह्यात विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन (जिल्हा परिवर्तन समिती), गडचिरोली आणि सोबाय टुरिझम एलएलपी (ट्रायबी टुर्स) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारामुळे जिल्ह्यात नाईट कॅम्पिंग, अ‍ॅडव्हेंचर टुरिझम, ट्रायबल व इको-टुरिझम, नैसर्गिक आणि वन्यजीव पर्यटन, ऐतिहासिक आणि किल्यांचे पर्यटन, धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन, सामाजिक व सामुदायिक पर्यटन, आध्यात्मिक आणि आरोग्य पर्यटन तसेच शैक्षणिक निसर्ग शिबिरांसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत.

मुतनुर, टिपागड, झाडापापडा, सिरोंचा सोमनुर संगम, कमलापुर हत्तीकॅम्प, लेखा मेटा, चपराळा अभयारण्य, अरततोंडी महादेव, कोठरी बुद्ध स्तूप, महादेवगड, तसेच जिल्ह्यातील इतर पर्यटन पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने कॅम्पिंग, ट्रेकिंग, रॉक क्लायंबिंग, निसर्गभ्रमण, आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक होमस्टे प्रकल्प अशा विविध संकल्पना प्रत्यक्षात येणार आहेत.

या उपक्रमांतून जिल्ह्यातील युवकांना गाईड, प्रशिक्षक, होमस्टे व्यवस्थापक, हस्तकला यांसारख्या क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, बचत गटाच्या महिलांसाठी स्वयंपाक व हस्तकला विक्रीद्वारे स्वयंरोजगाराच्या वाटा खुल्या होणार आहेत. यामुळे गडचिरोलीच्या आदिवासी कला, संस्कृती व परंपरा यांना नव्या पिढीसमोर सादर होण्याचे व्यासपीठ मिळेल. पर्यटन विकासामुळे स्थानिक पायाभूत सुविधा सुधारणार, नवीन उपक्रम सुरू होऊन गावोगावी आर्थिक चैतन्य निर्माण होईल आणि गडचिरोलीचा सकारात्मक व प्रेरणादायी चेहरा देश-विदेशातील पर्यटकांसमोर झळकणार आहे.

मा. जिल्हाधिकारी महोदयांचे या उपक्रमांतून फक्त्त पर्यंटकांना अनुभव देणे नसून, स्थानिक समुदायाला सशक्त करणे, संस्कृतीचे संवर्धन करणे आणि पर्यावरणपूरक पर्यटन घडवणे हे आहे.”

सोबाय टुरिझम एलएलपी (ट्रायबी टुर्स) चे संस्थापक पंकज नंदगिरीवार यांनी सांगितले की, “गडचिरोलीचा निसर्ग व संस्कृती यांचा आदर राखून स्थानिक जनतेच्या सहभागातून पर्यटनाची शाश्वत उभारणी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ‘Public-Private-Community Partnership’ या पद्धतीने हे प्रकल्प राबवले जाणार असून, प्लास्टिकबंदी, सौरऊर्जा वापर, बायो टॉयलेट्स अशा पर्यावरणपूरक उपाययोजनांचा अवलंब केला जाणार आहे.

या करारामुळे गडचिरोली जिल्ह्याची ओळख राज्य आणि राष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे उमटेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here