MLA Dr Devraoji Holi will provide sand to Gharkul beneficiaries of Gadchiroli assembly area at zero percent royalty.

67

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना शून्य टक्के रॉयल्टीने रेती उपलब्ध करून देणार आमदार डॉ देवरावजी होळी

MLA Dr Devraoji Holi will provide sand to Gharkul beneficiaries of Gadchiroli assembly area at zero percent royalty.

मौजा बोरघाट येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले शून्य टक्के रॉयल्टीचे वितरण,शासकीय योजनांचा लाभ देय असलेल्या सर्व योजनांना मोफत रेती मिळवून देणार

मोफत रेतीच्या ट्रॅक्टरला झेंडी दाखवून घरकुल लाभार्थ्यांना पोहचता केली रेती

गडचिरोली  Gadchiroli :-  मौजा बोरघाट येथे आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून मोफत रेतीचा लाभ मिळाला असून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व गरजू घरकुल लाभार्थ्यांना शून्य टक्के दराने मोफत रेतीचा लाभ मिळवून देणार असल्याचं प्रतिपादन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मौजा कळमगांव , सगनापुर, कान्होंली,बोरि, मुरखला माल , सोनापुर, जामगिरी,वाकडी, विक्रमपुर, मारोड़ा, मुरखला चेक या ग्रामपंचायतील जोडणाऱ्या गावाना याचा लाभ मिळणार येथे आज 0 % रॉयल्टीचे वितरण करताना केले. यावेळी त्यांनी शून्य टक्के रॉयल्टीच्या रेती भरलेल्या ट्रॅक्टरला झेंडे दाखवून घरकुल लाभार्थ्याकडे रेती पोहचता केली. यावेळी भाजपा तालुका भाजपाध्यक्ष दिलीपजी चलाख, शेषराव कोहळे ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव ,यांचे सह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी यासाठी आपण वारंवार शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. त्याला यश मिळाले असून लवकरच सर्वच लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here