मा. डॉ. अशोकजी नेते यांची भाजप राज्यपरिषद सदस्यपदी निवड — जनसेवेच्या वाटचालीला नवा मान सन्मान

93

मा. डॉ. अशोकजी नेते यांची भाजप राज्यपरिषद सदस्यपदी निवड — जनसेवेच्या वाटचालीला नवा मान सन्मान!

गडचिरोली | दि. ०९ जुलै २०२५

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आज राज्य परिषदेवरील ४५४ सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये गडचिरोलीच्या भूमीतून जनतेच्या सेवेसाठी समर्पित असलेले, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची राज्यपरिषद सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद ठरले आहे.

 

सामाजिक बांधिलकी, पक्षनिष्ठा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणाऱ्या डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची प्रामाणिक पावती म्हणता येईल. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जनतेशी अत्यंत आत्मीयतेने जोडले गेलेले त्यांचे नेतृत्व नव्या जबाबदारीसह अधिक व्यापक पातळीवर काम करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

 

या नव्या नियुक्तीबद्दल डॉ. अशोकजी नेते यांचे हार्दिक अभिनंदन! तसेच भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेमध्ये स्थान मिळवलेल्या इतर सर्व नवनियुक्त सदस्यांनाही हार्दिक शुभेच्छा…

“नव्या जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून लोकसेवेच्या कार्यात अधिक जोमाने सहभागी होण्याची संधी लाभली आहे. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास हीच खरी ऊर्जा आहे!”

— मा.खा. डॉ. अशोकजी नेते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here