गडचिरोली : यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या रजत वाळके यांचा सत्कार

89

गडचिरोली : यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या रजत वाळके यांचा सत्कार

 

गडचिरोली जिल्ह्यातील मौशिखांब–मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रजत वाळके यांनी देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. रजत वाळके यांनी या परीक्षेत 514 वी रँक मिळवून गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मौशिखांब–मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने रजत वाळके यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी रजत वाळके यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचे कौतुक केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, गडचिरोली जिल्हा हा राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र रजत वाळके यांनी यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवून गडचिरोली जिल्ह्याचे नाव राज्य आणि देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. योग्य मार्गदर्शन, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे रजत वाळके यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचे हे यश गडचिरोली जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, विनोद चापले, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, प्रकाश भजबुजे, अमित हुलके, सुरेश वाघाडे, अमर सोरते, प्रशांत ठाकूर, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, कैलास लाडे, दीपक राऊत, रोशन कोरते, विश्वनाथ भानारकर, जगदीश खेवले, कवडू खेडेकर, आशिष निकुरे, अमोल मेश्राम, मयुर मेश्राम, किशोर म्हशाखेत्री, मोहन ठाकरे, नवनीत मेश्राम, विलास नैताम, दीपक वलादे, जीवन कुरुडकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here