खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या हस्ते मोफत स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचे वितरण

107

खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या हस्ते मोफत स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचे वितरण

खासदार डॉ.  नामदेव कीरसान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा; सहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची मोफत पुस्तकांचे वितरण या सोबतच इतर सामाजिक उपक्रमांचे लोकसभा क्षेत्रात आयोजन

गडचिरोली ::  गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करिता पुस्तकाचे वितरण करण्यात आले. यासोबतच गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात विविध तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण, वृक्षारोपण, रुग्णालययात रुग्णांना फळ व अन्नदान वितरण सारखे विविध उपक्रम या निमित्ताने राबविण्यात आले.

पुस्तक वितरण कार्यक्रमास गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे 6 हजाराहून अधिक  विद्यार्थी युवक, माननीय खासदार महोदय यांच्यावर प्रेम करणारे स्नेहीजन, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते पदाधिकारी सह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here