निवडणूक कर्तव्यावरील कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये,कार्यालय प्रमुखांनी टपाली मतपत्रिकेसाठी अर्ज द्यावे-प्रसेनजीत प्रधान

206

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये,कार्यालय प्रमुखांनी टपाली मतपत्रिकेसाठी अर्ज द्यावे-प्रसेनजीत प्रधान

 

गडचिरोली दि. 21 (S,Bharat news network.) : लोकसभा निवडणुक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी कर्तव्यसावर मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यालय प्रमुखांनी विहित नमुना १२-ड जिल्हाधिकारी कार्यालयात भरून देण्याच्या सूचना टपाल मतपत्रिकेचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान यांनी केले आहे.

प्रत्येक कार्यालयाने एक नोडल अधिकारी नियुक्त करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २४ मार्च २०२४ पर्यंत नमुना 12-ड सादर करायचा आहे व त्यानुसार निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता टपाल पत्रिका प्राप्त करून घ्यायच्या आहेत. अर्ज सादर न झाल्यामुळे मतदानाच्या अधिकारापासून कोणी वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी सदर कार्यालय प्रमुखांची राहील असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले असल्याचे श्री प्रधान यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here