Arrival of His Excellency the President Government of India Draupadi Murmu at Nagpur Airport

341

महामहीम राष्ट्रपती भारत सरकार द्रोपदी मुर्मू यांचे नागपूर विमानतळावर आगमन

Arrival of His Excellency the President Government of India Draupadi Murmu at Nagpur Airport

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे आगमन नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर दि. ४ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर विमानतळावर मंगळवारी सायंकाळी आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपूर येथे आले आहेत.त्यांच्यासोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही आगमन झाले.
विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी,नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त अस्वती दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे,पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून उद्या ते गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमवेत उपस्थित राहणार आहेत. तसेच,नागपूर येथील कोराडी स्थित विद्याभवनाच्या सांस्कृतिक केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते सहभागी होणार आहेत.

(राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज मंगळवारी ४ जुलैला सायंकाळी ७ वाजता नागपुरात आगमन झाले. ५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here