Armed Naxalites beat forest personnel; Four motorcycles were also burnt

118

Armed Naxalites beat forest personnel; Four motorcycles were also burnt

सशस्त्र नक्षल्यांची वनकर्मचाऱ्यांना मारहाण; चार मोटारसायकलींचीही जाळपोळ

गडचिरोली,Gadchiroli  ता.6: रस्त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सशस्त्र नक्षल्यांनी मारहाण करून त्यांच्या 4 मोटारसायलींचीही जाळपोळ केली. ही घटना काल (ता. 5) संध्याकाळी अहेरी तालुक्यातील नैनेर-कापेवंचा मार्गावर घडली. काल कमलापूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी व्ही. एस. भोयर, वनपाल एस.एम.येडलावार, वनरक्षक प्रमोद तोडासे, हेमंत बोबाटे, क्षेत्रसहायक राजू मेडलावार आणि सर्वेअर गणेश रेपलवार हे कारसपल्ली रस्त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी मोटारसायकलने गेले होते

Kamalapur Forest Range Officer V. S. Bhoyer, Forester S.M.Yedlawar, Forest Guard Pramod Todase, Hemant Bobate, Field Assistant Raju Medlawar and Surveyor Ganesh Repalwar had gone on a motorcycle to survey the Karasapally road.

. काम आटोपून परत येत असताना 25 ते 30 नक्षली जंगलात दबा धरून बसल्याचे दिसून आले. त्यातील चार-पाच नक्षल्यांनी वनकर्मचाऱ्यांना अडवून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या चार मोटारसायकलींचीही जाळपोळ केली. रात्री उशिरा वनकर्मचारी पायीच कमलापूर येथे पोहचले. घटनास्थळी नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सचिव, कमांडर व अन्य कॅडर होते, अशी माहिती आहे. तक्रारीवरून पोलिसांनी नक्षल्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिली. अलीकडे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात नक्षल्यांनी धुडगूस घातला असून, हत्या, जाळपोळ आणि बॅनर लावून धमकी देण्याचे सत्र अवलंबिले आहे. यामुळे त्या भागात दहशत निर्माण झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here