ADMISSION INDICATION FOR CLASS 1 IN A RENOWNED ENGLISH MEDIUM RESIDENTIAL SCHOOL IN THE CITY FOR THE YEAR 2023-24

120

सन 2023-24 करिता शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता 1 ली करिता प्रवेशसुचना

गडचिरोली,(Gadchiroli)दि.04:सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाचा नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरिता शासनाची योजना असून त्याकरिता अनुसूचित जमातीचे (आदिवासी) प्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड, जि.गडचिरोली. या कार्यालयाकडून इयत्ता 1 ली वर्गात प्रवेश घेण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेशाकरिता जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून प्रवेश अर्ज नि:शुल्क वितरीत करण्यात येणार असून संपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 30 एप्रिल, 2023 पर्यंत स्वीकारले जातील. प्रवेशासंबंधी खालील अटी व शर्तीनुसार अर्ज करावे.   इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेण्याकरिता अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छुक विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्यांचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. जर विद्यार्थ्यांचे पालक दारिद्रयरेषेखालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले बी.पी.एल. प्रमाणपत्र जोडावे.(चालु सत्रातील प्रमाणपत्र जोडावे.),या योजनेचा लाभ घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रुपये. 1,00,000/- (अक्षरी एक लक्ष रुपये) इतकी असावी. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दिनांक 18 सष्टेंबर 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे असावे. विद्यार्थ्यांचा जन्मतारखेचा दाखला जोडण्यात यावा. (वयोमर्यादा इयत्ता 1 ली साठी जन्म दिनांक 31 डिसेंबर पर्यंत 6 वर्ष पुर्ण असावे.),अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जोडण्यात यावे. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत. तसे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्रक जोडावे व विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्त्या असल्यास अर्जासोबत तसा पुरावा जोडण्यात यावा. निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र अर्जासोबत जोडण्यात यावे. वरीलप्रमाणे प्रवेशाबाबतचे दाखले अर्जासोबत जोडून दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत सादर करावे. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणताही विचार करण्यात येणार नाही. शासननिर्णयाप्रमाणे निवड प्रक्रियेचा पूर्ण अधिकार प्रकल्पस्तरीय निवड समिती यांना राहील. शासन स्तरावरुन निवड झालेल्या शाळेत व मंजूर प्रवेश संख्येच्या अधिन विद्यार्थी निवड प्रक्रिया करण्यात येईल. मंजूर जागेपेक्षा जास्त प्रमाणात आवेदन प्राप्त झाल्यास ईश्वर चिठ्ठद्वारे निवड प्रक्रिया केल्या जाईल. प्रवेश अर्ज खालील ठिकाणी नि:शुल्क उपलब्ध आहेत. प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड .जि.गडचिरोली. असे सहा.प्रकल्प अधिकारी (शिक्षण ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड जि. गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here