मेगा रक्तदान शिबिरात 777 जणांचा सहभाग; प्रभाकरन यांच्या नेतृत्वाने मानवतेचा संदेश अधिक बळकट

20

मेगा रक्तदान शिबिरात 777 जणांचा सहभाग; प्रभाकरन यांच्या नेतृत्वाने मानवतेचा संदेश अधिक बळकट

कोनसरी सुरजागड (प्रतिनिधी):
सामाजिक बांधिलकी जपत Lloyds Metals and Energy Limited यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आयोजित मेगा रक्तदान शिबिराला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोंसारी आणि सुरजागड येथे पार पडलेल्या या शिबिरात तब्बल 777 जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा आदर्श घालून दिला. मागील वर्षी हा आकडा 501 इतका होता.
शिबिरादरम्यान उत्साहपूर्ण आणि एकात्मतेचे वातावरण पाहायला मिळाले. कंपनीतील सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवतेची सेवा आहे, याची जाणीव या उपक्रमातून प्रकर्षाने दिसून आली.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक B. Prabhakaran यांनी स्वतः पहिले रक्तदान करून आदर्श निर्माण केला. त्यांच्या कृतीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळाली.
यावेळी बोलताना प्रभाकरन यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “रक्तदान हा साधा उपक्रम असला तरी तो एखाद्याचे जीवन वाचवू शकतो. समाजाने मोठ्या संख्येने पुढे येऊन अशा उपक्रमात सहभागी व्हावे.”
त्यांनी पुढे नमूद केले की, अशा मानवतावादी उपक्रमांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असून त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होते. त्यांच्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांवर दिसून आला.
या मेगा रक्तदान शिबिराच्या यशामुळे कंपनीची सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी अधोरेखित झाली असून भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा कंपनीचा मानस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here