चामोर्शी–भेंडाळा मार्ग तात्काळ दुरुस्ती करा!भेंडाळा परिसरातील अनेक गावांचा संपर्क विस्कळीत

151

चामोर्शी–भेंडाळा मार्ग तात्काळ दुरुस्ती करा!भेंडाळा परिसरातील अनेक गावांचा संपर्क विस्कळीत

Repair Chamorshi-Bhendala road immediately! Communication between many villages in Bhendala area disrupted

चामोर्शी (प्रतिनिधी)

चामोर्शी–भेंडाळा मार्गाची स्थिती अतिशय दयनीय झाली असून पावसाळ्यात या मार्गावर जागोजागी खड्डे व चिखलाचे डबके तयार झाले आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवासी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून शेतमाल वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांची ये-जा तसेच रुग्णवाहिका सेवादेखील प्रभावित झाली आहे.

 

भेंडाळा परिसरातील कान्होली, मुरखडा, तुकुम, वाघोली, रामाळा, मोहोर्ली, फराडा, मार्कंडा, फोकोर्डी, नवेगाव या गावांचा संपर्क या मार्गावरून जोडला जातो. परंतु रस्त्यावरील खड्डे व पाणी साचल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतमाल पोहचवताना मोठ्या अडचणी येत आहेत.

 

स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागास वारंवार निवेदनं देऊनही दुरुस्ती झालेली नाही. “आम्ही रोज या मार्गावरून जातो, वाहनांची तोटे, वेळेची नासाडी व जीवितहानीचा धोका यामुळे आमचे हाल होत आहेत. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित विभागाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून वाहतुकीस सुरळीत करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here