पहिल्या दिवशी अहेरीतून एक नामनिर्देशन पत्र दाखल
गडचिरोली, (s bharat news network) दि.22: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. दिपक मल्लाजी आत्राम (अपक्ष) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. 67-आरमोरी (अ.ज.) व 68-गडचिरोली (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.
आज 22 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 5 व्यक्तींनी 20 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 9 व्यक्तींनी 25 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 11 व्यक्तींकडून 12 अर्जाची उचल करण्यात आली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.