महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत परतावा योजना

37

महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत परतावा योजना

गडचिरोली,(s bharat news network Gadchiroli)दि.09: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या (ओ.बी.सी.महामंडळ) थकीत कर्ज प्रकरणात लाभार्थ्यांसाठी एकरक्कमी परतफेड योजना (OTS) 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. महामंडळाच्या गडचिरोली जिल्ह्यातील थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here