देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींचा मेळावा नवेगाव व बोदली   येथे ४ ऑक्टोंबरला

20

देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींचा मेळावा नवेगाव व बोदली   येथे ४ ऑक्टोंबरला

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे लाडक्या बहिणींना उपस्थित राहण्याचे  आवाहन

नवेगाव   येथे सकाळी ११ वाजता तर  बोदली येथे दुपारी २ वाजता होणार मेळावा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, यांची  नोंदणी केली जाणार

दिनांक ३ ऑक्टोंबर गडचिरोली राज्याचे  मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस (देवा भाऊ) यांच्या लाडक्या बहिणींचा मेळावा गडचिरोली तालुक्यातील नवेगाव व बोदली  जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत नियोजित करण्यात आला असून दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी नवेगाव येथे सकाळी ११ वाजता तर बोदली येथे दुपारी २ वाजता होणार आहे . तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी  लाडक्या बहिणींना  केले आहे.हा मेळावा नवेगाव  येथे प्रसन्ना हॉल नवेगाव  पेट्रोल पंप जवळ सकाळी ११ वाजता होणार असून दुपारी २ वाजता   बोदली येथील ग्रामपंचायत पटांगणाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, यांची नवीन नोंदणी करण्यात येणार आहे.  तरी या मेळाव्याला लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने  उपस्थित राहावे   असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here