मलिकजी बुधवानी यांचा श्री गणेश उत्सवाचा संकल्प कौतुकास्पद आमदार डॉक्टर देवराव होळी

126

मलिकजी बुधवानी यांचा श्री गणेश उत्सवाचा संकल्प कौतुकास्पद आमदार डॉक्टर देवराव होळी

मलिक बुधवानी यांचेकडील श्री गणेशाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन

आदिवासी पारंपारिक पद्धतीने आमदार महोदयांचे एमआयडीसी परिसरात बुधवारी यांनी केले स्वागत

दिनांक १७ सप्टेंबर गडचिरोली

एमआयडीसी परिसरात साई सिमेंट ब्रिक्स कंपनीचे सर्वेसर्वा मलिकजी बुधवानी यांनी श्री गणेशाची स्थापना केली त्यानिमित्त आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे एमआयडीसी परिसरात आगमन झाले असता आदिवासी पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मलिकजी बुधवानी यांचा श्री गणेश उत्सवाचा संकल्प अतिशय सुंदर व कौतुकास्पद व सर्व धर्मीयांना प्रेरणा देणारा असल्याचे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here