कर्तव्यदक्ष तलाठी यांच्यावर विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने भ्याड हल्ला करून केली निर्गुण हत्या.कठोर शिक्षेची मागणी

162

कर्तव्यदक्ष तलाठी यांच्यावर विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने भ्याड हल्ला करून केली निर्गुण हत्या.कठोर शिक्षेची मागणी

कठोर शिक्षेची निवेदनामधून महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेची मागणी शासनास सादर

गडचिरोली :- मौजा आडगांव रंजे ता. वसमत जिल्हा हिंगोली येथील कर्तव्यदक्ष तलाठी श्री. संतोष पवार हे आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू व्यक्तिने भविष्यात त्यांच्या कौटुंबिक वादाची वाटणी होऊ शकते या शंकेच्या आधारावर श्री. संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकूने भ्याड हल्ला केला. आणि त्यांना जखमी केले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदरील घटना अत्यंत वेदनादायक व खेदजनक असून, महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. तलाठी संघटनेने आज दिनांक 29.08.2024 रोजी संपुर्ण महाराष्ट्र सदर घटनेच्या निषेधार्थ एक दिवसीय लक्षवेधी काम बंद आंदोलन पुकारीत असल्याबाबतचे निवेदन मा. संजय दैने, जिल्हाधिकारी गडचिरोली यांना तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना व विदर्भ मंडळ अधिकारी व तलाठी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने देण्यात आले.

 

महसुल विभागाकडे इतर विभागाचे कामे मोठ्या प्रमाणात शासनाकडून सोपविण्यात आणि लादण्यात येत असल्याने मुळ महसुली कामांवर विपरीत परीणाम होताना दिसून येते आहे. याव्दारे आपणांस विनंती करण्यात येते की, महसुल विभागातील मुळ कामे करण्यास महसूल विभागास भविष्यामध्ये इतर कामे सोपवून अडथळा निर्माण होणार नाही याबाबत राज्यस्तरावरुन दक्षता घेण्यात यावी ही विनंती. तसेच एका कर्तव्यदक्ष तलाठी यांच्यावर विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने भ्याड हल्ला करून खून केलेला आहे. त्या व्यक्तीवर फास्टट्रॅक न्यायालयात जलद गतीने खटला चालवुन आरोपीला अत्यंत कठोर शिक्षा देण्याबाबा राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री व मुख्य सचिव मुंबई यांना निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्फतीने सादर करण्यात आले आहे.

सदर निवेदन देते वेळेस तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा संघटक अमोल गव्हारे नायब तहसिलदार, जनक काळबाजीवार नायब तहसिलदार, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे नायब तहसिलदार, विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष विकास कुमरे व सचिव भूषण जवंजाळकर तसेच विदर्भ राजस्व निरीक्षक मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष नरेश वाते वसर्व वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here