करपनफुंडी प्रकरणात पोलीसांनी संशयीतांना घेतले ताब्यात

23

पोलीस मदत केंद्र येमली बुर्गी हद्दीतील मौजा करपणफुंडी तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथील बेपत्ता दोन इसमा पैकी बांडी नदीच्या पात्रात नामे बुरगु रैनु गोटा वय 65 वर्षे या महिलेचा मृतदेह ज्यास पायाला व हाताला दोरीसह दगड बांधून टाकलेल्या स्थितीत मिळून आला.सदर मृतक महिलेच्या पतीचा शोध घेणे सुरू असताना घटनास्थळापासून आठ किलोमीटर अंतरावर नदीपात्रात एक मृतदेह आढळून आलेला आहे सदर मृतदेहाची चौकशी करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आलदंडी येथे गुन्ह्याची नोंद करून सदर घटनेचा तपास करण्याकरिता 05 पथके तयार केली आहेत. सदर घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे यामध्ये 04 संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here