१५ ऑगस्ट च्या तिरंगा बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन
हर घर तिरंगा अभियानांतर्गत गडचिरोली शहरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन
१५ ऑगस्टला सकाळी १०:३० वाजता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीचा शुभारंभ
S bharat news network
गडचिरोली :- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरामध्ये तिरंगा महोत्सव सुरू असून त्याच प्रेरणेने गडचिरोली शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही तिरंगा रॅली आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सकाळी १०:३० वाजता सुरू करण्यात येणार आहे. या रॅलीला तिरंगा प्रेमी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.
रॅलीचा मार्ग याप्रमाणे राहणार आहे.
रॅली एकत्रीकरण व शुभारंभ आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली -इंदिरा गांधी चौक यू टर्न- धानोरा रोड- शिवाजी महाविद्यालय_ संघ कार्यालय -रेड्डी गोडाऊन- चामोर्शी रोड- सायन्स कॉलेज गोकुळनगर बायपास रोड -आयटीआय चौक -कारगिल चौक -इंदिरा गांधी चौक त्यानंतर आमदार जनसंपर्क कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.