गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला चारचाकी वाहनासह 8,24,000/- रुपयाचा माल जप्त

115

गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला चारचाकी वाहनासह 8,24,000/- रुपयाचा माल जप्त

 

गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द मा. पोलीस अधिक्षक श्री. निलोत्पल सा. यांनी अवैध दारु विक्री करणा­यावर कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.

आज दिनांक 06/09/2023 रोजी पहाटे गडचिरोली शहरातील अवैध दारु वाहतूक संदर्भात कारवाई करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड व पोअं/3951 प्रशात गरफडे, पोअं/3862 श्रिकृष्ण परचाके, पोअं/3857 श्रीकांत बोईना, चापोहवा/1681 मनोहर तोगरवार यांचे सह शासकिय वाहनाने रवाना झाले असता, इसम नामे आकाश भरडकर हा दामदेव मंडलवार आणि त्यांचे 02 मुले नीरज मंडलवार व निखिल मंडलवार हे चालवीत असलेल्या राज बार येथून दारुचा मुद्देमाल घेऊन चारचाकी सुमो वाहनाने गडचिरोली शहरात आणणार आहे. अश्या गोपणीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे मुल रोडवर शोध घेत असतांना सदर संशयित वाहन सेमाना बायपास मार्गे पोटेगाव रोड व तिथुन चातगावकडे पळून जात असताना त्यांचा पाठलाग केला असता, वाहनात असलेले 02 अज्ञात इसम बोदली गावाच्या जवळ वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सदर वाहनाची (किंमत अंदाजे 5,00,000 रुपये) पाहणी केली असता, त्यात विदेशी दारु व बियर किंमत 3,24,000/- रुपये असा एकुण 8,24,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर बाबत पोलीस स्टेशन गडचिरोली येथे 1) आकाश भरडकर, 2) निखील मंडलवार, 3) निरज मंडलवार तसेच दोन अनोळखी इसमांविरुद्ध कलम 65 (अ), 83, 98 (2) महा. दा. का. सह कलम 353, 332 भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्रातील पुढील तपास सपोनि. आव्हाड करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here