एकच प्याला या नाटकाचे उदघाटक मा.श्री.अशोकजी नेते खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा यांच्या हस्ते उद्घाटन
दिं. ०४ मार्च २०२३
Mudaza(Jalsai)chandrapur मुडझा:-या नाटकाच्या उदघाटन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना या समाजात व्यसनाचे प्रमाण तरुण युवकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसतो. त्यामुळे समाजामध्ये वावरत असतांना या नाटकाप्रसंगी चांगले बोध, चांगले विचार,चांगले आचरण घेतले पाहिजे . तसेच या परिसरात वाघाची दशहत फार मोठ्या प्रमाणात आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार वनमंत्री,तथा पालकमंत्री यांना सतत मागणी करून त्यांना निदर्शनात आणून देण्याचं काम मी स्वतः केलं आहे. तसेच तरुण युवकांने समाजामध्ये उद्बबोधन करणाचं काम करावं व चांगल्या गोष्टी घेण्याचं प्रयत्न करावा.व नाटकाचा आस्वाद घ्यावा असे प्रतिपादन या नाटकाच्या उदघाटन प्रसंगी मा.खासदार श्री.अशोकजी नेते यांनी केले.
यावेळी मा.प्रा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र तथा लोकसभा क्षेत्राचे जिल्हा संयोजक, तसेच जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे यांनी प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.
यावेळी खासदार अशोकजी नेते,
मा.प्रा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र,मा.श्री.प्रशांतजी वाघरे भाजपा जिल्हा महामंत्री गडचिरोली, मा.श्री.अविनाश भाऊ पाल जिल्हाध्यक्ष ओबीसी आघाडी तथा भाजपा तालुकाध्यक्ष सावली, मा.श्री.डॉ.बालपांडे साहेब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,मा.श्री.अरुणजी शेंडे भाजपा तालुकाध्यक्ष ब्रम्हपुरी, मा.श्री.शंकरदादा सातपुते माजी जि.प.सदस्य ,मा.श्री.आश्रयजी पोरेड्डीवर मा.श्री.सालोटकर सर भाजपा ओबीसी आघाडी ब्रम्हपुरी, कविंद्रजी रोहणकर, मा.श्री.ज्ञानेश्वरजी दिवटे भाजपा युवा नेते, मा.श्री. अनिलजी तिजारे सरपंच ग्रा.प. तळोधी खुर्द ,मा.श्री.उमेशजी घुले सरपंच मुई मा.श्री.ज्ञानेश्वरजी भोयर माजी सरपंच ग्रा.प. गांगलवाडी, मा.श्री.माणिकजी पा.थेरकर मा.श्री.पुरुषोत्तमजी पा.खेवले मा.श्री.तनयजी देशकर भाजयुमो जिल्हा सचिव, मा.श्री. अविनाशजी मस्के भाजपा सोशल मिडिया संयोजक ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र, मा.श्री.धिरजजी पाल भाजपा संयोजक सोशल मिडिया ब्रम्हपुरी तालुका.तसेच मोठ्या संख्येने नाटय रसिक उपस्थित होते.