Attend the meeting of teachers and office bearers of BJP on 25th January in large numbers BJP District General Minister Pramodji Pipre’s appeal

101

भाजपच्या 25 जानेवारीला होणाऱ्या शिक्षक व पदाधिकारी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा   भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांचे आवाहन

Attend the meeting of teachers and office bearers of BJP on 25th January in large numbers BJP District General Minister Pramodji Pipre’s appeal

मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांची उपस्थिती

 

: – दि. 24 जाने.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ भारतीय जनता पार्टी शिवसेना (बाळासाहेबांची) आरपीआय (आठवले ) समर्थित उमेदवार नागो पुंडलिक गाणार यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता फनशन हॉल चामोर्शी रोड, गडचिरोली येथे शिक्षक व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आम. चंद्रशेखरजी बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त शिक्षक व भाजपा पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.

आज दिनांक 24 जानेवारी रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार नागो पुंडलिक गाणार यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक 25 जानेवारी रोजी आयोजित शिक्षक व पदाधिकारी यांच्या मेळाव्याच्या नियोजनासाठी महत्वाची बैठक भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे ,माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, शहर महामंत्री केशव निंबोड, शहर महामंत्री विनोद देवोजवार, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, जिल्हा सचिव गीताताई हिंगे, महिला आघाडी च्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका अल्काताई पोहनकर, लता लाटकर, नीता उंदिरवाडे, वैष्णवी नैताम, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, संजय मांडवगडे, भाजयुमो चे शहर महामंत्री हर्षल गेडाम, राजू शेरकी, श्याम वाढई उपस्थित होते.या बैठकीत मेळाव्याचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले व सर्व पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षक व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मेळाव्यासाठी घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here