भाजप महिला मोर्चा च्या वतीने शहरातील गर्भवती महिलांचा सन्मान

169

भाजप महिला मोर्चा च्या वतीने शहरातील गर्भवती महिलांचा सन्मान

गडचिरोली :- दि. 14 जुलै

2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. भरड धान्यापासुन विविध पौष्टिक पदार्थ बनवून अंगणवाडी केंद्राअंतर्गत येणाऱ्या गरोदर महिलांना पौष्टिक आहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. हे अभियान केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आले असून दि.5 जुलै ते 25 जुलै पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोली वतीने महिला मोर्चा च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते गडचिरोली शहरातील सर्वोदय वार्ड व विवेकानंद नगर वार्डातील रश्मी खरकाटे व पूजा लाटलवार या गर्भवती महिलांचा राजगिराचे लाडू, खिचडी व शाल, श्रीफळ तथा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगरसेविका लताताई लाटकर, अर्चना चन्नावार, पुनम हेमके, अरुणा गुंफलवार, कुसुम कळमकर, श्रेया तलमले, विवेकानंद नगरातील अंगणवाडी केंद्र क्र. 9 च्या अंगणवाडी सेविका कविता गेडाम, मदतनीस ललिता साखरे, आरती बावणे, शोभा मंडल, उषा तरोने, राणी उप्पलवार, वैशाली ठाकरे, ऐश्वर्या गुरनुले, कुसुमबाई कोंडे, राजू खरकाटे, कमल खरकाटे व वार्डातील महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here