स्वतःच्या मुलाला जिवे ठार मारणाऱ्या निर्धयी वडील आरोपीस जन्मठेप व 10,000/- रुपये द्रव्यदंड तसेच दंड न भरल्यास 6 महीने वाढीव शिक्षा

164

स्वतःच्या मुलाला जिवे ठार मारणाऱ्या निर्धयी वडील आरोपीस जन्मठेप व 10,000/- रुपये द्रव्यदंड तसेच दंड न भरल्यास 6 महीने वाढीव शिक्षा

 

गडचिरोली येथील मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्णय

 

सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 04/01/2021 रोजी दुपारी 13.30 वा. चे सुमारास फिर्यादी नामे गं. भा. राधा शंकर कोडापे, वय 25 वर्ष, रा. येकाबंडा, ता. अहेरी ही आपले मुली सह घरी हजर असतांना फिर्यादीचे पती मृतक नामे शंकर रामा कोडापे (पती) व आरोपी नामे रामा गंगा कोडापे (सासरे) दोन्ही रा. येंकाबंडा, ता. अहेरी यांच्यामध्ये दुपारी 13.30 वा. च्या सुमारास आरोपी याने माझा कोंबडा का कापलास ? या कारणावरुन मृतक व आरोपी यांच्यामध्ये झगडाभांडण करुन आरोपीने मृतक याला बाजेवर ढकलुन दिले व घरातुन जुनी वापरती लोखंडी कुऱ्हाड हातात घेऊन मृतक नामे शंकर रामा कोडापे यांचेवर निर्दयीपणे त्यांच्या उजव्या व डाव्या हातावर, पोटावर, हाताच्या कोपऱ्यावर मांडीच्या मागच्या बाजुला दोन्ही पायावर लोखंडी कुऱ्हाडीने सपासप वार करुन जिवे ठार मारुन पळुन गेले. नंतर फिर्यादी हीने शंकर कोडपे यांना हात लावुन हलवुन उठविण्याचे प्रयत्न केले असता मृतकाने काहीच हालचाल केली नसल्याने फिर्यादी ही येंकाबंडा येथुन पोलीस स्टेशन जिमलगट्टा येथे येवुन वरीलप्रमाणे घडलेली घटनेची पोस्टे पोस्टे जिमलगट्टा येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिल्यावरुन अप क्र. 01/2021 कलम 302 भादवी, 4/25 भारतीय हत्या कायदा अन्वये गुन्हा नोंद केला.

 

सदर घटनेची पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप दाखल केले असता से. के. क्र. 36/2021 अन्वये मा. सत्र न्यायालयात खटला चालवुन आज दिनांक १०/०८/२०२३ रोजी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी सरकारी पक्षाचा युक्तीवाद व साक्षदारांचे बयान ग्राहय धरुन कलम ३०२ भादवी मध्ये जन्मठेप व 10,000/- रुपये द्रव्यदंड तसेच दंड न भरल्यास 6 महीने वाढीव शिक्षा ठोठावण्यात आली.

 

सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील श्री. एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोउपनि / राहुल मंचकराव फड, उप पोलीस स्टेशन जिमलगट्टा यांनी केले तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here