मुलचेरा तालुक्यात बालविवाह रोखला जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली यांची कार्यवाही

54

मुलचेरा तालुक्यात बालविवाह रोखला जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली यांची कार्यवाही

 

गडचिरोली,(Gadchiroli दि.26 : गडचिरोली जिल्हयातील मूलचेरा तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह जोडण्याकरिताची बोलणी सुरू असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार लगेच जिल्हा बाल संरक्षण टीमनी सदर बालविवाह थांबविला. बालिकेचा विवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांनी मूलचेरा तालुक्यातील अंगणवाडी येथे भेट घेऊन बालिकेच्या वयाची खात्री केली असता सदर बालिकीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याबाबत खात्री पटल्यानंतर गावातील पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांना घेऊन बालिकेचे घर गाठले तिथे उपस्थित मुलाकडील पाहुणे मंडळी व मुलीकडील मंडळी व गावातील पंच यांचे बैठक सुरू होती यात पंच यांचे सदर लग्न करणयास मनाई दिसून आली यात गावातील माजी पोलीस पाटील सुभास दास (पटेल) यांचे दोन्ही पक्षाला समज देण्याकरिता मोलाचे सहकार्य लाभले. त्यानुसार बालिकेचे वडीलांना बालिकेचा जन्मपुरावा दाखवण्यासंदर्भात विचारले असता बालिकेचे वय 16 वर्ष 10 महिने असल्याचे कागदपत्र नुसार लक्षात आले. त्यामुळे लग्नाची बोलणी करून लग्न लावण्याबाबत मनाई करण्यात आली तसेच लग्न केल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. त्यानुसार बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नका अशी हमीपत्र पालकांकडून लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले .

 

सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, सामाजिक कार्यकर्ता( मास्टर ट्रेनर) जयंत जथाडे, संरक्षण अधिकारी चामोर्शी पुरुषोत्तम मेश्राम महेंद्र मारगोणवार संरक्षण अधिकारी मूलचेरा यांनी कार्यवाही केली. सदर बालविवाह थांबविण्याबाबत विनोद हाटकर बाल विकास प्रकल्प अधिकारी मूलचेरा, सविता परेश बर्मन पोलिस पाटील, कल्पना पाल या अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह करण्याकरिता लग्नाची बोलणी करणे सुद्धा पालकांना अडचणीत आणू शकते असे होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री क्र.1098 या क्रमांक वर बाल विवाह बाबत संपर्क साधावे नाव सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here