तीर्थक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिरात स्वच्छता अभियान खासदार अशोक नेते यांनी स्वच्छतेसाठी घेतला हाती झाडू-पोचा भजन पूजन, दिंडीसह, मार्कंडेश्वरांच्या मंदिर स्वच्छतेच्या अभियानाला खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात सुरुवात

167

तीर्थक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिरात स्वच्छता अभियान खासदार अशोक नेते यांनी स्वच्छतेसाठी घेतला हाती झाडू-पोचा भजन पूजन, दिंडीसह, मार्कंडेश्वरांच्या मंदिर स्वच्छतेच्या अभियानाला खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात सुरुवात

दि.१८ जानेवारी २०२४

चामोर्शी:-देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांनी मंदिर स्वच्छतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतः स्वच्छता करून देशभरात मंदिर स्वच्छतेचा संदेश देत येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून देशभरात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी जिल्हा – गडचिरोली स्वच्छता मंदिर अभियान अंतर्गत विस्तृत कार्यक्रमाची रूपरेषा आखत आज दिं.१८ जानेवारी २०२४ रोज गुरूवार ला चामोर्शी तालुक्यातील आपल्या परिसरातील नावाजलेले पवित्र तीर्थक्षेत्र विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराच्या मंदिरात खासदार अशोक नेते यांनी स्वतः,मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वच्छता करून आपल्या हाती झाडू व पोचा घेऊन भजनदिंडीसह स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.मंदिराची स्वच्छता करून इतरही भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपणही मंदिराची स्वच्छता करावी.असे आवाहन यावेळी खा.नेते यांनी केले.

 

यावेळी खासदार अशोक नेते यांनी प्रथमतः भगवान मार्कंडेश्वरांचे भक्तीभावाने पूजन करीत मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वच्छता करून भजन दिंडीसह स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.खासदार अशोक नेते व भाजपा पदाधिकाऱ्यांनसह हाती झाडू व सफाईचा पोचा घेऊन साफसफाई करून मंदिर व परिसर स्वच्छ केले.

 

प्रथम मार्कंडेश्वर मंदिराच्या प्रवेश द्वारावर येतांच भजन दिंडीसह पुष्पहाराने खासदार अशोक ‌‌नेते यांचे जल्लोषात स्वागत केले.

 

तसेही खासदार अशोक नेते तीर्थक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध असून त्यांचे सतत प्रयत्नही चालू आहे.लवकरच मार्कंडेश्वर मंदिराच्या विकास कामाचे भूमिपूजन होईल अशी यावेळी ग्वाही दिली.

 

याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,भाजपचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे,जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे,खासदार महोदयांची कन्या आशिताताई, शहराध्यक्ष सोपान नैताम,शहर महामंत्री नरेश अल्लसावार, वासुदेव चिचघरे, आदिवासी आघाडीचे महामंत्री रेवनाथ कुसराम,जेष्ठ नेते माणिक कोहळे,भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सेवानिवृत्त छबिलदास सुरपाम देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सरपंचाच्या संगीता राजू मोगरे,उपसरपंच उमाकांत जुनघरे,पो.पा.आरती आभारे,युवा शहर अध्यक्ष भाविक आभारे,जेष्ठ नेते भाऊजी दहेलकर, सेवकराम बोरकुटे, दिवाकर कोहळे,विजय गेडाम, राजू धोडरे,श्रावण सोनटक्के, राजू चुधरी,अतुल गीरकुटवार, पुजारी पांडे महाराज,गुरव महाराज मनोज हेबीज,राजू मोगरे,घनश्याम आभारे,भुजंग आभारे,नकटु तिवाडे,भैया आभारे,पांडुरंग आभारे,बाबुराव शेंडे, राजू शेंडे, तसेच गावातील नागरिक व भजन मंडळी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here