गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी ५० कोटीहून अधिक रुपयांचा निधी

226

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी ५० कोटीहून अधिक रुपयांचा निधी

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश

 

बजेट मधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

गडचिरोली(gadchiroli):-आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील रस्ते विकास कामांसाठी बजेट मधून ५० कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झालेला असल्याने लवकरच या निधीतून विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची कामे होण्यास मदत होईल

राज्य सरकारने गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहे.

राज्य रत्यांच्या विकास कामांसाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भाडभिडी-घोट- रेगडी कसनसुर रस्ता (२ कोटी रूपये), तळोधी- -आमगाव -भाडभिडी — देवदा रोड (३ कोटी), चातगाव- कारवाफा पोटेगाव गाव रोड (३ कोटी), कारवाफा बोटेहुर पेंढरी रस्त्यावरील लहान लहान पूलांसाठी ७ कोटी रुपये भाडभिडी कसनसूर घोट रोड (२.५ कोटी) मुल-हरणघाट- मुलचेरा रोड १० कोटी चातगाव — मार्कंडा देव रोड ५ कोटी, मौशिखांब-वैरागड- पळसगाव रस्त्यासाठी १३ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

यासह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील रामकृष्णनगर — कृष्णनगर रोड, पुस्टोला- जारावंडी रोड, येनापुर-सुभाषग्राम रोड, चामोर्शी-वागदरा रोड, पुस्टोला-धारंगी रोड ,याही जिल्हा रस्त्यांसाठी बजेट मधून मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध झालेला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here