आरोग्य केंद्रांच्या शिपायाने पाच वर्षीय बालिकेवर केला कु-कर्म(गडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक घटना)

92

एट्टापल्ली(गडचिरोली महाराष्ट्र)Ettapalli (Gadchiroli maharashtra) : दारासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली.

वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. ९ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास पीडित मुलगी स्वतःच्या घरासमोर खेळत होती. शेजारी आरोग्य कर्मचाऱ्यांची शासकीय निवासी वसाहत आहे.संतोष कोंडेकर हा तिथे एकटाचराहतो. त्याने मुलीला जवळ बोलावले व घरात नेऊन तिच्याशी कुकर्म केले. हा प्रकार एका मुलीने पाहिला व घरी जाऊन सांगितला. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले; पण तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे उपचारासाठी मुलीला घेऊन ते रात्री जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पोहोचले.मुलीला १० मार्चला सकाळी अधिक उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. उपचारांत झालेल्या हलगर्जीवरून सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. पीडितेच्या आईच्या जबाबावरून गडचिरोली ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी प्रकरण एटापल्ली तालुक्यातील संबंधित पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.दरम्यान, वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचारात हलगर्जी झाली असेल तर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दावल साळवे यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here