धानोरा येथे क्रिडा संकुल व वाढीव पाणीुरवठा योजना मंजूर करा आमदार डॉ देवरावजी होळी यांना धानोरा वासियांचे निवेदन

144

धानोरा येथे क्रिडा संकुल व वाढीव पाणीुरवठा योजना मंजूर करा आमदार डॉ देवरावजी होळी यांना धानोरा वासियांचे निवेदन

शासन स्तरावर पाठपुरावा करून डिसेंबर पर्यंत मंजूरी मिळवून देणार

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे निवेदकांना आश्वाशन

Dhanora -Gadchiroli 5 nov :-धानोरा तालुक्यात क्रीडा संकुलाची मागणी मागील अनेक वर्षांपासून असून त्याला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा तसेच वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून धानोरा वासियांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कडे केली.यावेळी निवेदन देताना भाजपाचे जिल्ह्याचे नेते साईनाथजी साळवे ,अनंतजी साळवे महादेवजी गणोरकर, नगरसेविका वैशाली ताई धाईत, नगरसेविका प्रतीक्षाताई गुंडावार, नगरसेवक संजीव कुंडू, नगरसेवक लंकेश म्हशाखेत्री, जेष्ठ नेते गजाननजी साळवे, युवा नेते सारंग साळवे , राकेश खरवडे ,घनश्यामजी मडावी सुभाष खोबरे, करीमजी असानी, मंन्नालाल शेंद्रे, प्रकाशजी धाईत यांचे सह धानोरा येथील नागरिक बंधू प्रामुख्याने उपस्थित होते डिसेंबर महिन्यापर्यंत आपण धानोरा वासीयांसाठी क्रीडा संकुलासाठी निधी व वाढीव पाणीपुरवठा साठी लागणारा निधी शासनाकडून मंजूर करून घेऊ अशी हमी यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी निवेदकांना दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here