जोडीदार

266

विषय:- सात जन्माची सोबत

शीर्षक :- जोडीदार

तुझ्या सुंदर प्रितीने

आला जीवनाला रंग,

उजळले रंगात त्या

सख्या, माझे अंतरंग!!१!!

 

पूर्व पुण्य माझे थोर

जोडीदार गुणवंत,

विश्वासाने हात दिला

किती आहे भाग्यवंत!!२!!

 

सोन पावलांनी आले

जीवनाचा श्री गणेशा,

खेचूनिया आणल्या त्या

सौभाग्याच्या भाग्यरेषा !!३!!

 

जन्मोजन्मी तूच पती

ईश्वराला निवेदन,

प्रेम बहरून आलं

आनंदाची उधळण !!४!!

 

तुझे हास्य तेजःपुंज

राहो सदा मुखावर,

बाधा होणारच नाही

पुष्पवृष्टी सुखावर !!५!!

 

जीव तुझ्यात गुंतला

तुम्ही माझे श्रद्धास्थान,

मन मंदिरात नित्य

पतिदेवा अधिष्ठान !!६!!

सौ. स्मिता गणेश पाटील

रायगड मोबा.८९९९८०२५८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here