अखेर जिल्हा मजूर सहकारी संघाच्या चौकशीचे आदेश मुंबई येथे सहकार मंत्री ना. अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत दिले निर्देश

228

अखेर जिल्हा मजूर सहकारी संघाच्या चौकशीचे आदेश मुंबई येथे सहकार मंत्री ना. अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत दिले निर्देश

 

तालुक्यातील संख्यानिहाय मजूर सहकारी संस्था निर्माण करण्याचेही दिले निर्देश

मुंबई:-गडचिरोली जिल्हा मजूर सहकारी संघाच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी व जिल्हा मजूर सहकारी संघाला बरखास्त करण्यात यावे यासंदर्भात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मागणी केलेल्या मुद्द्यांवर गडचिरोली जिल्हा मजूर सहकारी संघाच्या चौकशीचे आदेश सहकार मंत्री अतुलजी सावे यांनी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये दिले.यावेळी बैठकीला सहकार मंत्री अतुलजी सावे यांचे सोबत आमदार डॉक्टर देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे आयुक्त , गडचिरोली जिल्हा उपनिबंधक, यांचे सह वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यामध्ये ४२ मजूर सहकारी संस्था असताना केवळ १८ मजूर सहकारी संस्थांनाच काम दिला जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार व अनियमितता आहे.बैठकीमध्ये आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मागणी केलेल्या मुद्द्यांवर गडचिरोली जिल्हा मजूर सहकारी संघाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करावा तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये तालुका निहाय संख्येच्या प्रमाणामध्ये नव्याने मजूर सहकारी संस्थांची निर्मिती करावी असे निर्देशही मंत्री महोदयांनी बैठकीमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here