MP of government supported maize procurement center at Mulchera Shri. Inauguration by Ashok Nete

95

मुलचेरा येथे शासकीय आधारभूत मक्का खरेदी केंद्राचा खासदार  श्री. अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन

 

दि.०३ जुन २०२३

 

Mulchera-gadchiroli मुलचेरा: कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या वतीने मुलचेरा येथे मक्का खरेदी शासकीय आधारभूत किंमत उन्हाळी मक्का खरेदी सन -२०२३ अंतर्गत मुलचेरा येथे उन्हाळी दुयम हंगाम म्हणुन मक्का खरेदी केल्या जाणाऱ्या केंद्राचे उद्घाटन खासदार अशोक जी नेते यांच्या हस्ते आज दिं. ०३ जुन २०२३ ला मक्का केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

 

शासकीय आधारभूत उन्हाळी मक्का हा शेतकऱ्यांसाठी दुय्यम पीक म्हणून मोठया प्रमाणात परिसरात घेतल्या जात असून याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांना होईल त्याकरिता आज मक्का या खरेदी केंद्राचा शुभारंभ होत असून याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन यावेळी खासदार अशोक जी नेते यांनी केले.

 

यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते, यांच्यासोबत भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे,भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश दता, संजिव सरकार जिल्हा सचिव तथा युवा मोर्चा ता. अध्यक्ष ,बादल शहा जिल्हा सचिव, विद्यान वैद्य बंगाली आघाडी चे जिल्हा महामंत्री, अशोक मुजुमदार बंगाली आ.ता.अध्यक्ष, रणजीत मंडल बुथ प्रमुख,नेपाल सरकार बुथ प्रमुख, अशोक कर्मकार बुथ प्रमुख, सत्यजित मंडल,परितोष हलदार,मोतीलाल मंडल,मिलन विशवास,बबलु मुजुमदार,समिप सरकार, गणेश बारई,तसेच बरेच मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here