दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पणw

191

दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण

डिकेएसझेडसीएम (दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य) गिरीधर व डिव्हीसीएम संगिता याच्या आत्मसमर्पणानंतर आज रोजी कंपनी क्र. 10 च्या दोन सेक्शन कमांडर यांनी केले आत्मसमर्पण

.शासनाने जाहिर केले होते एकुण 16 लाख रूपयाचे बक्षिस.

S Bharat news network gadchiroli :-  date 27/06/2024 -शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 666 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 27 जून 2024 रोजी दोन जहाल महिला माओवादी नामे 1) बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. 10, वय 28 वर्ष, रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व 2) शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. 10, वय 29 वर्षे, रा. कटेझरी ता. धानोरा, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

 

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती

 

1) बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे

 

 दलममधील कार्यकाळ

 

श्व् सन 2010 मध्ये गट्टा दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून कार्यरत.

श्व् सन 2010 च्या शेवटी अहेरी दलममध्ये बदली होऊन कार्यरत.

श्व् सन 2016 मध्ये अहेरी दलममधून कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन कार्यरत.

श्व् सन 2021 मध्ये पीपीसीएम/एसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य//एरीया कमिटी सदस्य) म्हणून बढती व आजपर्यंत कार्यरत

 

* कार्यकाळात केलेले गुन्हे

 

तिच्यावर आजपर्यंत एकुण 21 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 10 चकमक, 01 जाळपोळ, 01 अपहरण व 9-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

 

 

2) शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके

 

 दलममधील कार्यकाळ

 

श्व् सन 2011 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत.

श्व् सन 2013 मध्ये टिपागड दलममधून कंपनी क्र. 04 येथे बदली.

श्व् सन 2021 मध्ये कंपनी क्र. 04 मधून कंपनी 10 येथे बदली.

श्व् सन 2023 मध्ये पीपीसीएम/एसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य) या पदावर बढती व आजपर्यंत कार्यरत.

 

* कार्यकाळात केलेले गुन्हे

 

तिच्यावर आजपर्यंत एकुण 08 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 06 चकमक, 02 इतर, इ. गुन्ह्रांचा समावेश आहे.

 

* आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

 

 दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.

 नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.

 वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

 दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.

 पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे.

 खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.

 चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.

 नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही..

 गडचिरोली जिल्ह्रात तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

 

 

 

 

 शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

 

 

 महाराष्ट्र शासनाने बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 महाराष्ट्र शासनाने शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 

 

 आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.

 

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे हिला एकुण 05 लाख हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईकेहिला एकुण 05 लाख हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 19 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here