लोकमत “भूषण” सन्मान 2024 पुरस्काराने इंजि.प्रमोदजी पिपरे सन्मानित

117

लोकमत “भूषण” सन्मान 2024 पुरस्काराने इंजि.प्रमोदजी पिपरे सन्मानित.

गडचिरोली:-३० जुन :- जनतेचा ध्यास…लोकांचा विश्वास लोकमत गडचिरोली “भुषण सन्मान 2024” पुरस्काराने भाजपा लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे यांना सन्मानित करण्यात आले. दिनांक २९ जुन २०२४ रोजी हॉटेल तुली इंपेरीयल,रामदासपेठ नागपूर येथे लोकमत भुषण सन्मान २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी माजी खासदार तथा लोकमत समुहाचे अध्यक्ष डॉ. विजयजी दर्डा,प्रमुख अतिथी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान, विशेष अतिथी प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर,प्रमुख अतिथी माजी सामाजिक न्याय मंत्री,(म.रा)उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here