True spiritual peace is achieved only in the service of the people. BJP General Minister Mr. Pramod Pipre

81

विविध कार्यक्रमाने प्रमोद पिपरे यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

जिल्हा महिला व बाल रुग्णालयात फळ वाटप क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नप उच्च प्राथमिक शाळा गोकुलनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

 

गडचिरोली:- दि. 13/12 :- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, जिल्हा महामंत्री तथा ओबीसी चे नेते , महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष, आदिवासी सेवक मा. प्रमोदजी पिपरे यांचा वाढदिवस शहरात विविध ठिकाणी रुग्णांना फळ वाटप, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना विविध साहित्य वाटप अशा कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील महिला रुग्णांना फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, भाजपचे शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडी च्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, भाजयुमोचे शहर अध्यक्ष सागर कुमरे यांच्या हस्ते जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील गरोदर महिला व स्तनदा मातांना फळांचे वाटप करण्यात आले.तदनंतर गोकूलनगर येथील न प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी भाजपचे व्यापारी आघाडी चे अध्यक्ष गजानन यनगंधलवार, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, श्रीकांत पतरंगे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड, भाजयुमो चे शहर महामंत्री हर्षल गेडाम, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, ओबीसी महिला मोर्चा च्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, माजी नगरसेविका नीता उंदिरवाडे, लताताई लाटकर कोमल बारसागडे, पूनम हेमके, युवा मोर्चा चे निखिल चरडे, राजू शेरकी, युवा नेते संजय मांडवगडे, विश्व हिंदू परिषदेचे नितेश खडसे, नरेंद्र भांडेकर, श्यामजी वाढई, विजय शेडमाके, संजय हजारे, प्रशांत अलमपटलावार, नैताम, राजू नेवारे, अनुराग प्रमोद पिपरे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here