The meeting was held at the government rest house under the chairmanship of the former mayor of Gadchiroli city

87

The meeting was held at the government rest house under the chairmanship of the former mayor of Gadchiroli city

गडचिरोली येथे भाजप शहर कार्यकारिणीची बैठक

गडचिरोली :- दि. 19/12 भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 19 डिसेंबर रोजी गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा महिला ओबीसी मोर्चा च्या जिल्हा संयोजिका योगीताताई पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, गडचिरोली तालुका अध्यक्ष अर्चना बोरकुटे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका अलकाताई पोहनकर, माजी नगरसेविका नीताताई उंदिरवाडे, शहर महामंत्री रश्मीताई बानमारे, ओबीसी महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अर्चना निंबोड, महिला आघाडी आदिवासी मोर्चाच्या शहराध्यक्ष भावना कुलसंगे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे , महिला आघाडी च्या सोशल मीडिया प्रमुख यिशा फ़ुलबांधे प्रामुख्याने उपस्थित होत्या. या बैठकीत उद्या होणाऱ्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीबाबत व त्या बैठकीच्या नियोजन बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व बैठकीचे नियोजन करण्यात आले व भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारीनी सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याने या बैठकीला महिला आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुका कार्यकारिणीच्या याद्या व धन्यवाद मोदीजींचे पोस्टकार्ड बाबत सविस्तर माहिती घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी शहर आघाडीच्या वतीने करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here