The deadline for submission of quarterly manpower information is January 31

160

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी पर्यंत

 

The deadline for submission of quarterly manpower information is January 31

santoshbharatnews gadchiroli दि.23: जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणा-या सर्व कर्मचा-यांची पुरुष/स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस भरणे आवश्यक आहे. विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या या संकेतस्थळावरून ऑनलाईन पदधतीने सदर माहिती सादर करणे बंधनकारक असून अंतिम मुदत 31 जानेवारी 2023 पर्यंत आहे. डिसेंबर 2022 अखेर संपणा-या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य्‍ विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्र.-2,युनिट क्रमांक-2 कॉम्प्लेक्स,गडचिरोली येथे दि.01 जानेवारी 2023 पासून सुरु झाले आहे. याकरिता 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे तरी गडचिरोली जिल्हयातील महास्वयंमपोर्टलवर नोंदणी असलेल्या या कार्यालयाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यांत आलेले आहेतच. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपली अचूक माहिती ऑनलाईन पदधतीने सादर करावी.

सदरील डिसेंबर 2022 अखेरचे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी हे तिमाही विवरण मुदतीत ऑनलाईन पदधतीने सादर करावे. तदधतच प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावे असे आवाहन जिल्हा कौशल्य्‍ विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्र.-2,युनिट क्रमांक-2 कॉम्प्लेक्स,गडचिरोली या कार्यालयाने केले आहे.

****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here