विवाहित महिलेस अश्लिल मॅसेज पाठविणा-या आरोपीला ५०००/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.अहेरी येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, श्री. आर.एन, बावणकर यांचा न्यायनिर्णय

92

विवाहित महिलेस अश्लिल मॅसेज पाठविणा-या आरोपीला ५०००/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.अहेरी येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, श्री. आर.एन, बावणकर यांचा न्यायनिर्णय

The accused who sent obscene messages to a married woman was fined Rs.5000/-. Additional Sessions Judge, Shri. Judgment of RN, Bawankar

अहेरी (गडचिरोली)Aheri (Gadchiroli) S Bharat news network :-  मौजा असरअल्ली येथील फिर्यादी महिला हिला ग्रामपंचायत मधील उप सरंपच आरोपी नामे धर्मस्या किष्टया वडलाकोंडा हे फिर्यादी महिला हिचे घरी वरचेवर ये-जा करुन फिर्यादी हिचे सोबत नेहमी फोनवर अश्लिल बोलून व मॅसेज केल्याने फिर्यादीला लाज वाटली व तिचे पतीला सांगून रडल्याने फिर्यादीचे पतीने आरोपीचे घरी जावून घटनेबद्दल विचारले असता आरोपीने फियादीला शिविगाळ करुन “तूला काय करायचे आहे तू करुन घे” असे धमकावले. त्यानंतर आरोपीची पत्नी ही फिर्यादीचे घरी जावून फिर्यादीचे समक्ष तिचा पतीला पोलीस रिपोर्ट बाबत धमकी दिली, म्हणुन फिर्यादी महिला हिने आरोपी विरुध्द कायदेशीर तक्रार दिली.

 

फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे असरअल्ली अप.क. ०६/२०१६, कलम ३५४(ड), ५०४,५०९ भादवी तसेच ३(२) अट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने दोषारोपपत्र तयार करुन सेशन कोर्टात दाखल केले.

 

मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, अहेरी याने स्पेशल केस क्र. १६/२०२३ मध्ये साक्ष पुरावा घेतले असता फिर्यादी व साक्षीदार यांचे पुरावा व सरकारी पक्षाचे युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरुन दिनांक २१/०६/२०२४ रोजी आरोपी नामे धर्मय्या किष्टया वडलाकोंडा, वय ४३ वर्ष य. असरअल्ली ता. सिरोंचा जि. गडचिरोली यास कलम ३५४(ड) भादवी मध्ये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा तसेच पुढील तीन वर्षाकरीता याप्रकारचे गुन्हे करणार नाही याचे हमीपत्र व ५०००/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली,

 

सरकार पक्षातर्फे सहा, सरकारी वकील श्री. सचिन यू. कुंभारे यांनी कामकाज पाहीले तसेच गुन्हयाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. शिवाजी पवार तसेच श्री. गजानन राठोड यांनी केला, तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अंमलदार यांनी कामकाज पाहीले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here