Teli Samaj brothers should participate in bride-to-be introduction gathering in large numbers. District President of Maharashtra Provincial Tailik Mahasabha Pramodji Pipre.

71

Teli Samaj brothers should participate in bride-to-be introduction gathering in large numbers. District President of Maharashtra Provincial Tailik Mahasabha Pramodji Pipre.

तेली समाज बांधवांनी वधु-वर परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे   महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांचे आवाहन

१८ डिसेंबर ला राज्यस्तरीय तेली समाज वधु वर परिचय महा मेळावा

 

गडचिरोली :- दि. 16/12 :- राष्ट्रीय तेली समाज मेरेज ब्युरो, आरमोरी जिल्हा गडचिरोली च्या वतीने शिवपार्वती मंगल कार्यालय गडचिरोली येथे दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोज रविवारला सकाळी ११:०० वाजता राज्यस्तरीय तेली समाज वधू वर परिचय महामेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. तरी या वधु-वर परिचय मेळाव्यात तेली समाज बांधवांनी व उपवर- वधुनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तेली समाजाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे

कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या हस्ते होणार असून सह उदघाटक म्हणून बालरोग तज्ज्ञ मा.डॉ .प्रशांतजी चलाख उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी भाग्यवानजी खोब्रागडे, किसनराव खोब्रागडे शिक्षणसंस्था आरमोरी हे राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून योगीताताई भांडेकर माजी जिला परिषद अध्यक्ष गड.,मा. श्री सूर्यकांत खानखे चंद्रपूर, तेली समाजाचे नेते मा. श्री बाबुरावजी कोहळे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे , जि प चे माजी कृषी सभापती प्रा.रमेशजी बारसागडे,

राज्य सहकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे दक्षिण चे जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव वासेकर,संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष देवानंदजी कामडी, प्रा नंदाजी सातपुते, प्रा.पी.आर.आकरे, डॉ. सत्यविजय दूधबळे, डॉ. तामदेव दूधबळे,ऍड.रामदास कुनघाडकर, माजी नप सभापती मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक राहुल नैताम,नगरसेवक आशिष पिपरे, माजी नगरसेवक वैष्णवी नैताम, छबुताई वैरागडे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

लग्न समारंभ जोडताना वधू -वरांचे परिचय होणे आवश्यक आहे प्रत्येक मुला- मुलींना असे वाटते की आपल्याला चांगले स्थळ मिळाले पाहिजे आजचे युग ऑनलाईनचे आहे पण ऑनलाईन नाते जोडतानाही प्रत्यक्ष परिचय होणे गरजेचे आहे मेळाव्यात वधू वर पसंती व्हावी आणि नाते जुळून यावे, यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तेली समाज मेळाव्यात राज्यातील तसेच बाहेर राज्यातील तथा जिल्ह्यातील वधू-वर पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिचय मेळाव्याचा लाभ घेणार आहेत

तरी या राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर परिचय मेळाव्यात तेली समाज बांधव माता भगिनीनी व विवाहास इच्छुक युवक -युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेली समाजाचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here