Stop the work of pipe line in Ganesh Nagar Colony

100

गणेश नगर कॉलनीतील पायली/पाईप लाईनचे काम बंद करा

सिमेंट काँक्रेट चे नाली बांधकाम करा

  • गणेश नगर कॉलनीतील नागरिकांचे न. प. मुख्याधिकारी यांना निवेदन

गडचिरोली-

चंद्रपूर मार्गावरील गणेश नगर येथील सांडपाणी वाहणाऱ्या नाल्याचे बांधकाम नगर परिषद ने थांबविले आहे. तसेच सर्वे नंबर 855 NA TP 2005 जिल्हाधिकारी मंजूर लेआऊट मध्ये नाला कुठेही नाही. तरी सुद्धा नगर पालिका अधिकारी नागरिकांचा विरोध असून सुद्धा जबरदस्ती 855 मधील लेआऊट मधील घरासमोरून 900 एम एम सिमेंट पायली टाकण्याचा काम हाती घेतलेला आहे. स्थानिक रहिवासी नागरिकांचा त्या पायली कामाला विरोध असून सुद्धा नगर पालिका अधिकारी हे जबरदस्ती ते काम करण्याच्या भूमिकेत आहे. त्या कामात पालिका अधिकारी यांना स्थानिक नागरिकांचा विरोध असून सुद्धा ते जबरदस्ती पायल्या टाकण्याचे काम करीत आहेत. व रस्त्याच्या बाजूने ९०० एम.एम. सिमेंट पाईप/पायली पाईपला सर्व नागरिकांचा विरोध आहे. जिल्हाधिकारी साहेब यांनी पायल्या कामाला नामंजूरी दिली होती. असे जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वतः नागरिकांसमोर सांगितले होते.तरी नगर पालिका नागरिकांच्या सोयीसाठी काम करणे नागरपालिकेचे काम असते सर्व्हे नं. ८५५ येथील ९ मी. रस्त्याच्या बाजूने म्हणजेच संबंधीत लेआऊट मधील प्लॉट व घरांच्या लगत ९०० एमएम सिमेंट पाईप/पायली पाईपलाईन बांधकाम करण्याची कार्यवाही चालू आहे. सदरहू पाईपलाईन ही बारमाही तलावातून होणा-या ओवरफ्लो पाण्याचा मार्गाला व कॉम्पलेक्स पासून येणा-या सांडपाण्याचा मार्गाला म्हणजेच रामटेके डुप्लेक्स पर्यंत आलेल्या नाल्याला जोडण्याचा कार्यवाही चालू आहे. परंतु सदर कार्यवाहीमूळे सर्व्हे नं. ८५५ मध्ये राहणा-या नागरिकांच्या घरांना / मालमत्तेला मोठया प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे. त्याकारणास्तव सर्व्हे नं. ८५५ मध्ये राहणा-या नागरिकांचा वरिल ९०० एमएम सिमेंट पायली पाईपलाईन बांधकामासंदर्भात सहमत नाही, आक्षेप आहे आणि विरोध आहे. करिता या स्तरावर सदर बांधकाम करण्यात येऊ नये, ही विनंती.

निदर्शन सर्व्हे नं. ८५५ हा एन.ए.टी.पी. ड ले-आऊट आहे व या ले-आऊट मध्ये कोणत्याही प्रकारचा नाला दर्शविलेला नाही. तसेच सर्व्हे नं. ८५५ व लागून असलेल्या ले-आऊट मधील ९ मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला नगरपरिषद्द्वारे यापूर्वीच काँक्रीट नालीचा बांधकाम झालेला आहे. करिता सर्व्हे नं. ८५५ मध्ये राहणा-या आम्हा नागरीकांचा अशी मागणी आहे की, सर्व्हे नं. ८५५ येथील उर्वरीत ९ मी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कायमचा बाक्सटाईप कॉक्रीट नालीचा बांधकाम करून देण्यात यावे. ज्यादवारे फक्त घरांतील सांडपाण्याचा विसर्ग / मार्ग होईल. सदरहू बॉक्सटाईप कॉक्रीट नालीचा मार्ग कोणत्याही प्रकारच्या नाल्याला जोडण्यात येऊ नये. व इतर अन्य मार्गाने कायमचा कॉक्रीटचा बांधकाम करण्यात यावा. ज्यामधून बारमाही वाहणा-या तलावातील पाणी व सांडपाण्याचा विल्हेवाट लावता येईल, तसेच रामटेके डुप्लेक्स पासून गायब झालेला नाला हा आपल्या रेकॉर्ड मध्ये शोधून ज्या ठिकानावरून असेल त्याठिकाणी तो नाला काढण्यात यावा. आम्हच्या सर्वे नं. 855 लेआऊट मध्ये कोणताही नाला नाही त्यामुळे 855 मध्ये कोणताही अनधिकृत बांधकाम करू नये. अन्यथा नागरिकांच्या तीव्र रोषाला/ विरोधाला सामोरे जावे लागेल. तसेच संपूर्ण नागरिकांकडून जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येईन असा इशारा गणेश नगर वसाहतीतील नागरिकांनी दिला आहे. तसेच जबरदस्ती काम सुरू केल्यास नागरिक काम होऊ देणार नाही. तसेच स्वतःच्या घरासमोर 900 एमएम पाईप टाकू देणार नाही.

मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार, वासुदेव भोयर, मनोज इरकुलवार, प्रवीण चाकीनारपवार, भास्कर सेलोटे, तुळशीराम समर्थ, चंदू, ठलाल, वैशाली धाईत, मनीषा चन्नावार, वनिता सेलोटे, मनीषा ढवळे, कविता चकिनारपवार, अरविंद सालोटकर, पूजा सालोटकर सह कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here