Shiv Chhatrapati State Sports Award Application dt. To be submitted by March 31

121

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज दि. 31 मार्च पर्यंत सादर करावेत

 

गडचिरोली,(दि.27: दि. 14 डिसेंबर 2022 अन्वये शासननिर्णयानुसार काही खेळाडूंचे फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्या कारणाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता अर्ज सादर करू शकले नाहीत. यास्तव त्यांचे नुकसान होऊ नये व सदर खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये. याकरीता अशा खेळाडूंनी (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता पात्र खेळांमधील ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात असे सहभागी/प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त) त्यांचे प्रस्ताव व विहीत नमून्यातील अर्ज ( खेळाडू) दि. 31 मार्च, 2023 कार्यालयीन वेळेपर्यंत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत, असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here