
ऊद्या संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव व तेली समाज मेळावा तेली समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Pramod pipare
गडचिरोली :- दि. 7/12 gadchiroli महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघ, जिल्हा गडचिरोली संताजी सोशल मंडळ गडचिरोली,
Maharashtra Provincial Tailik Federation, District Gadchiroli Santaji Social Mandal Gadchiroli,
विदर्भ तैलिक महासंघ जिल्हा गडचिरोली, तेली समाज समिती सर्वोदय वार्ड , तेली समाज सेवा समिती हनुमान वार्ड गडचिरोली, संत जगनाडे महाराज बहुउदेशीय संस्था गडचिरोली, संताजी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली व तेली समाजाचे संयुक्त विद्यमाने दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम व भव्य तेली समाज मेळाव्याचे आयोजन संताजी स्मूती प्रतिष्ठान, सर्वोदय वार्ड ,आरमोरी रोड गडचिरोली च्या सभागृहात करण्यात आले आहे.*
*कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलगुरू मा डॉ श्री श्रीराम कावळे सर , जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री रोहिदास राऊत व प्रा. श्री शेषराव येलेकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघ दक्षिण चे जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव वासेकर, विदर्भ तैलिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भांडेकर , संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा देवानंद कामडी, संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भगवान ठाकरे, घनश्याम लाकडे व तेली समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.*
*8 डिसेंबर रोजी सर्वप्रथम सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी चौकात संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून जयंती समारोहाची सुरुवात करण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी 12 वाजता संताजी स्मूती प्रतिष्ठान च्या सभागृहात श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती उत्सव व भव्य तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. 6 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली तथा सर्व तेली समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक पार पडली यावेळी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातील व शहरातील तेली समाज बांधवांनी तसेच महिला व युवक- युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विविध तेली समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.