Organized a workshop at Hotel Landmark Gadchiroli in association with International Institute for Prevention of Diabetes Pune and Assistant Director Diabetes Gadchiroli

83

कृष्ठ रोग्यांना मानवी सेवेचा आधार देण्याची गरज आमदार डॉ देवरावजी होळी

 

आंतरराष्ट्रीय कृष्ठ रोग निवारण संस्था पुणे आणि सहाय्यक संचालक कृष्ठ रोग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल लँडमार्क गडचिरोली येथे कार्यशाळेचे आयोजन

Organized a workshop at Hotel Landmark Gadchiroli in association with International Institute for Prevention of Diabetes Pune and Assistant Director Diabetes Gadchiroli

मा.भिकुजी (दादा) ईदाते पूर्वाध्यक्ष राष्ट्रिय विमुक्त जाती जमाती आयोग भारत सरकार आनंदवन वरोराचे डॉ विजय पोळ यांची प्रमुख उपस्थिती

कृष्ठ रोग्यांच्या सेवेकरिता आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देणार आमदार महोदयांचे आश्वासन

आंतरराष्ट्रीय कृष्ठ रोग निवारण संस्था पुणेचे आजीवन सदस्यत्व स्वीकारले

गडचिरोली :- एखादया व्यक्तीला कृष्ठरोग झाल्यानंतर त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन तर बदलतोच मात्र त्यांचे जवळचे नातेवाईक देखील कृष्ठरोगाच्या माहीती अभावी त्या व्यक्तिपासून दुर राहण्याचा प्रयत्न करतात. माञ कृष्ठ रोग्यांची सेवा ही एक ईश्वरसेवा असून कृष्ठ रोग्यांना मानवी सेवेचा आधार देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी आंतरराष्ट्रीय कृष्ठ रोग निवारण संस्था पुणे आणि सहाय्यक संचालक कृष्ठरोग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल लँडमार्क गडचिरोली येथे आयोजित कृष्ठरोग जनजागृती व मानवाधिकार या २ दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.यावेळी मंचावर मा.भिकुजी (दादा) ईदाते पूर्वाध्यक्ष राष्ट्रिय विमुक्त जाती जमाती आयोग भारत सरकार, डॉ शरद भोसले कार्यकारी संचालक आंतरराष्ट्रीय कृष्ठ रोग निवारण संस्था पुणे, डॉ सचिन हेमके सहाय्यक संचालक, कृष्ठ रोग गडचिरोली, आनंदवन वरोराचे डॉ विजय पोळ, डॉ आरती मॅडम सांगली, प्रामुख्यानं उपस्थित होते.कार्यक्रमाला उपस्थित मा.भिकुजी (दादा) ईदाते पूर्वाध्यक्ष राष्ट्रिय विमुक्त जाती जमाती आयोग भारत सरकार यांनीही मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात आमदार डॉ देवरावजी होळी म्हणाले की, मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मुलमंत्राचा आधार घेवून सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने या कृष्ठरोग निवारण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय कृष्ठ रोग निवारण संस्था पुणेचे आजीवन सदस्यत्व स्वीकारले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here