Krantijyoti Savitribai Phule’s thoughts are eternal. Pratima Karne’s statement,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार अजरामर आहे. सौ.प्रतिमा करमे यांचे प्रतिपादन

148

Krantijyoti Savitribai Phule’s thoughts are eternal. Pratima Karme’s statement

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार अजरामर आहे.प्रतिमा करने यांचे प्रतिपादन

गडचिरोली  Gadchiroli :-दि ३ जानेवारी  सायंकाळी पंचशील बुद्ध विहार रामनगर गडचिरोली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती साजरी करण्यात आली

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुखदेव वासनिक अध्यक्ष पंचशील बौद्ध समाज मंडळ रामनगर गडचिरोली चे  हे होते.तर कार्यक्रमाला प्रमुख अतीथी म्हणून मधुकर लोणारे सचिव,पंचशिल बौद्ध समाज मंडळ रामनगर व अनुराधा कुंभारे,उपाध्यक्ष त्रिषरण महिला मंडळ रामनगर गडचिरोली ह्या होत्या.यावेळी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आणि त्यांनी समस्त भारतीय महिला साठी केलेल्या त्यागाबाबत सविस्तर विचार व्यक्त केले.त्या पश्चात प्रबोधनकार सौ.जयश्रीताई गावतुरे यांचा फुले,शाहू,आंबेडकर यांचे तत्वज्ञानावर प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमा. सुत्रसंचालन प्रतिमा करन  यांनी केले तर प्रस्ताविक अनुराधा कुंभारे ,आभार प्रदर्शन पुष्पा वासनिक यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुकर लोणारे सचिव, वासुदेव कोल्हटकर सदस्य,केशव शेंडे सदस्य,विश्वनाथ वनकर सदस्य,नागसेन खोब्रागडे, सल्हागार पंचशिल बौद्ध समाज मंडळ रामनगर गडचिरोली तसेच अनुराधा कुंभारे उपाध्यक्ष,प्रतिमा करमे सह – सचिव, अर्चना मानकर कोषाध्यक्ष,पुष्पा वासनिक सदस्य त्रिषरन महिला मंडळ रामनगर गडचिरोली यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला रामनगर, शाहूनगर कॅम्प एरिया,स्नेह नगर,कन्नमवार नगर येथील सर्व बौद्ध उपासक/ उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here