जहाल माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

86

जहाल माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

शासनाने जाहिर केले होते एकुण 02 लाख रूपयाचे बक्षिस.

Jahal Maoist surrendered before Gadchiroli police and CRPF force

गडचिरोली :-  शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 663 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 10 जून 2024 रोजी एकुण 02 लाख रुपये बक्षिस असलेला जहाल माओवादी नामे किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके वय 37 वर्ष रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांनी त्याचे हस्तांतरण गडचिरोली पोलीस दलाकडे केले.

 

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

 

नामे किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके

 

 दलममधील कार्यकाळ

 

श्व् सन 2014 मध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून (भामरागड दलम) मध्ये भरती होवून सन 2015 पर्यंत कार्यरत होता.

श्व् सन 2015 मध्ये डीएकेएमएस (दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना) मध्ये अध्यक्ष पदावर पदोन्नती होवून सन 2018 पर्यंत कार्यरत.

श्व् सन 2018 मध्ये आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) सदस्य म्हणून सन 2022 पर्यंत कार्यरत.

श्व् सन 2022 पासून भामरागड दलम सदस्य व आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) चा अध्यक्ष पदावर पदोन्नती होवून आजपावेतो कार्यरत.

 

 कार्यकाळात केलेले गुन्हे

श्व् चकमक – 03

 

 सन 2017 मध्ये मौजा दरबा पहाडी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

 सन 2021 मध्ये मौजा कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

 सन 2022 मध्ये मौजा पेनगुंडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

 

श्व् खून – 04

 

 सन 2015 मध्ये मौजा मल्लमपड्डूर तलावाजवळील रोडवर झालेल्या एका निरपराध इसमाच्या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 सन 2018 मध्ये मौजा गोंगवाडा टी-पॉइंट जवळ झालेल्या एका निरपराध महिलेच्या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 सन 2019 मध्ये मौजा जूवी नाल्याजवळ झालेल्या एका निरपराध इसमाच्या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 सन 2023 मध्ये मौजा पेनगुंडा ते गोंगवाडाकडे जाणा­या कच्या रोडवर झालेल्या एका निरपराध इसमाच्या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 

श्व् जाळपोळ – 04

 

 सन 2021 मध्ये मौजा मरकनार ते मुरुमभूशी रोड जंगल परिसरात वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 सन 2022 मध्ये मौजा बोटनफंुडी ते विसामुंडी रोड जंगल परिसरात वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 सन 2022 मध्ये मौजा पेनगंुडा रोड जंगल परिसरात जेसीबी व ट्रॅक्टर वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 सन 2023 मध्ये मौजा हिद्दुर गावाजवळ रोड कामावरील 4 (1 जेसीबी, 3 ट्रॅक्टर) वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 

श्व् ईतर – 02

 

 सन 2021 मध्ये मौजा कोठी ते कोठी टोला रोडवर माओवादी बॅनर व पत्रके लावण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 सन 2023 मध्ये मौजा नेलगुंडा जंगल परिसरात जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

 

गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे.

दलममधील सोबतच्या सदस्यांना पोलीसांकडून अटक करण्यात आल्याने व घरातील सर्व सदस्य व नातेवाईकांनी आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे.

दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.

वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.

 

शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

महाराष्ट्र शासनाने किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके याचेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.

 

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके याला एकुण 4 लाख 50 हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 

 

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 15 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. जगदीश मीणा, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ श्री. एम.एच. खोब्राागडे, पोलीस अधीक्षक, विशेष कृती दल नागपूर श्री. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर श्रीमती. ज्योत्स्ना मसराम, सपोनि. जितेंद्र वैरागडे, पोहवा/प्रमोद पुरी सह सीआरपीएफ 37 बटा. बी-कंपणीने पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here