Completed training of 56 disaster-friends under disaster management

92

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत 56 आपदा-मित्रांचे प्रशिक्षण पूर्ण

Completed training of 56 disaster-friends under disaster management

दुसरी बॅच 26 डिसेंबर पासून, इच्छुक स्वंयसेवक युवक-युवतींनी सहभाग नोंदवावा

 

Gadchiroli गडचिरोली, दि.25 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे द्वारे दिनांक 13 ते 24 डिसेंबर दरम्यान जिल्हयातील आपत्तीप्रवण भागातील युवक-युवतींचे जिल्हास्तरावर आपदा-‍मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविला. शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली येथे प्रथम बॅच मध्ये एकुण 56 प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले.प्रथम बॅचच्या समारोपप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमासह तहसिलदार गडचिरोली महेन्द्र गणवीर, नेहरु युवा केंद्र गडचिरोली जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांचे उपस्थितीत सर्व प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र तसेच स्पर्धेतील विजेत्यांना गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.कार्यक्रमांतर्गत सर्व प्रशिक्षणार्थी यांना सत्रानुसार निशुल्क योगाचे धडे राखीताई भैसारे यांनी दिले. व्यायाम मार्गदर्शन बाबा वासनिक, मंगलसिंह राठोड, अविनाश राठोड, आनंद चव्हाण यांचे द्वारे देण्यात आले. प्रशिक्षणाचे विविध सत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनातील मास्टर ट्रेनर्स यांचे द्वारे आपत्ती, आणिबाणी, धोका, आपत्तीचे प्रकार, आपत्कालीन फ्रेमवर्क, धोरण, संस्थात्मक यंत्रणा, घटना प्रतिसाद प्रणाली, आपदा मित्राची भुमिका, जबाबदारी आणि भविष्यातील प्रतिबध्दता, फ्रेमवर्क, हवामान बदल इत्यादी विषयावर गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे यांचे द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. गर्दी व्यवस्थापन या विषयावर आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी यांनी मार्गदर्शन केले    प्रशिक्षणार्थींना प्रथमोपचार, मानवी शरीर प्रणाली, जखमा, रक्तस्त्राव, फ्रॅक्चर्स, बर्न्स आणि स्कॅल्डस, प्राणि, किटक, साप चावणे, बि.एल.एस., कृत्रिम श्वासोश्वास तंत्र, सि.पी.आर, चोकिंग, इमरजन्सी लिफटींग आणि हलवण्याच्या पध्दती , सुधारीत स्ट्रेचर या बाबत आरोग्य विभागातील मास्टर ट्रेनर्स वैद्यकिय अधिकारी डॉ.नागदेवते, डाँ.धुर्वे, डाँ.पकज हेमके, डॉ.विनोद बिटपल्लीवार, डॉ.उमेश शिडाम, डॉ.गौरव डोंगरे, डॉ.अतुल घोडाम, डॉ.पराग गोन्नाडे, डॉ.सुबत मंडल, नर्सिंग ट्युटर श्रीमती नँन्सी विल्सन यांचे द्वारे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. फायर सेफटी , फॉरेस्ट आणि फार्म फायर, फायर हायड्रेट आणि आगाऊ यंत्रणा, फायर एक्सटींग्युशर हाताळणे याबाबतचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक नगर परिषद गडचिरोली यांचे अग्निशमन विभागातील मास्टर ट्रेनर्स यांचे कडुन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. आण्विक, जैविक, रासायनिक आपत्ती, पीपीई सुट आणि इतर सुट प्रणाली, दोरीचे प्रकार, दोरी बचाव, नॉटस आणि हिचेस, घरगुती टाकाऊ साहित्यापासून पूरामध्ये जीव वाचविण्याचे साधन तयार करणे तसेच लाईफ बॉय, लाईफ जॅकेटचा पूरामध्ये वापर कसा करायचा याबाबतचे प्रात्यक्षिक तसेच बोटीद्वारे पूरामध्ये अडकलेल्या नागरीकांचा जीव कसा वाचवायचा याबाबतचे प्रात्यक्षिक वैनगंगा नदीचे पात्रात कोटगल या गावी सर्व प्रशिक्षणार्थी यांना राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक ईश्वर रंदई तसेच पथकातील जवान संदिप इखार, संजय श्रीरामे, जावेद शेख, शंकर राठोड, उमेश ठाकरे तसेच पोलीस विभागातील मोटार परिवहन विभागातील स्थानिक बचाव पथकातील गुंजन, प्रेमानंद टेकाम, योगेश परदेसी यांचे द्वारे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षणा दरम्यान स्थळ भेट अंतर्गत गोंडवाना सैनिक स्कूल गडचिरोली येथे भेट देण्यात येवून माजी सैनिक यांचेमार्फत प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थी यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर जनजागृती करण्यासाठी पथनाट्य द्वारे नागरिकांपर्यंत संदेश कसा पोहोचविता येईल या करिता मास्टर ट्रेनर सुनील अष्टेकर, उत्तम उके यांचे द्वारे प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले. आपदा-मित्र प्रशिक्षण कार्यक्रमातील सत्रानुसार सर्व उपक्रम जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मीणा तसेच निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सल्लागार क्रिष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुबंडे, अव्वल कारकुन आपत्ती व्यवस्थापन शाखा स्वप्नील माटे, पुणेश पोटावी, भारत लोंढे, विजय मोनगुलवार तसेच जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पाडण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे द्वितीय बँच दिनांक 26.12.2022 ते 06.01.2023 या कालावधीत होणार असून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करण्यास इच्छुक स्वंयसेवक युवक-युवती यांनी सहभाग नोंदवावा या करिता आपले जिल्हा कार्यालयातील मोबाईल क्रमांक 9423911077 यावर नोंद करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here