Breaking News: Police-Naxal encounter in Gadchiroli, two Naxalites killed

152

Breaking News: Police-Naxal encounter in Gadchiroli, two Naxalites killed

ब्रेकींग न्यूज : गडचिरोलीत पोलीस-नक्षल चकमक, दोन नक्षलवादी ठार

गडचिरोली, २३ डिसेंबर :- जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील दामरंचा जंगल परिसरात पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. गडचिरोली आणि छत्तीसगड राज्यातील बिजापूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

अहेरी तालुक्यातील दामरंचा जंगल क्षेत्रातील छत्तीसगड राज्याच्या सीमेवर गडचिरोली पोलीस आणि बिजापूर पोलीस संयुक्त अभियान राबवत होते. दरम्यान नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून मृतांमध्ये एका महिला नक्षलीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन सुरू असून आणखी काही नक्षली मारले गेल्याचा अंदाज पोलीस दलाने व्यक्त केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here