Awarded to 24 health institutes under Kayakalp Yojana

58

Awarded to 24 health institutes under Kayakalp Yojana

कायाकल्प योजनेअंतर्गत 24 आरोग्य संस्थाना पुरस्कार प्रदान

गडचिरोली,(Gadchiroli)दि.21: सर्व आरोग्य संस्थामध्ये कायाकल्प योजना राबविण्यात येत असून शासनाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेतील गुणवत्ता आणि सोयी सुविधा,उत्कृष्ट सेवा,बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट आणि स्वच्छता सर्व लाभार्थ्यांना देण्यात येतात.या सर्व बाबीचा विचार करुन आरोग्य संस्थाना कायाकल्प योजने अंतर्गत पारितोषीक करीता पात्र ठरविण्यात आलेले आहेत.यात 50 हजार ते 3 लाखापर्यंत पुरस्काराची रक्कम आहे.या रक्कमेतून आरोग्य संस्थाच्या सोयी सूविधामध्ये आणखी भर टाकण्यात येईल.

जिल्हा,महिला व बाल रुग्णालय,उपजिल्हा,ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली जाते.या सेवेचा दर्जा उंचावला जावा यासाठी शासनाकडून विधिध उपाययोजना केल्या जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून दर्जेदार सेवा देणाऱ्या आरोग्य संस्थाना कायाकल्प पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.आरोग्य संस्थाचे कायाकल्प जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समीतीकडून मुल्याकन केली जाते व 70 टक्यापेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या संस्थांना पुरस्कारसाठी गौरविण्यात येते.

आरोग्य संस्थेची पुरस्कारासाठी निवड करताना अंतर्गत व बाहय परिसर स्वच्छता,निर्जतूकीकरण,बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,पाणी बचत,सांडपाण्याचा निचरा आणि रुग्ण सेवेचे रेकॉर्ड आदि बाबीची पाहणी केली जाते.निवड करण्यात आलेल्या आरोग्य संस्थामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय,महिला व बाल रुग्णालय यांना 3 लाखाचे प्रोत्साहनपर पारितोषीक देण्यात येत आहे.उपजिल्हा रुग्णालय,आरमोरी व कुरखेडा यांना 1 लाखाचे प्रोत्साहनपर पारितोषीक देण्यात येत आहे.तसेच प्रा.आ.केंद्र अहेरी सावंगी यांना प्रथम पुरस्कार 2 लाख देण्यात येत आहे.त्याचप्रमाणे प्रा.आ.केंद्र.देऊळगाव,भेंडाळा,देलनवाडी,पेंढरी,कारवाफा,कसनसूर,टेकडाताला,मोयाबीनपेठा,पोर्ला,कुरुड,कोरेगाव,महागाव,जिमलगट्टा आणि आरेवाडा या सर्व प्रति आरोग्य केंद्रांना 50 हजाराचे प्रोत्साहनपर पारितोषीक देण्यात येत आहे.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद कडून आरोग्य संस्थाच्या बळकटणीकरणावर भर देण्यात येत आहे.त्यामुळे सन 2021-22 मध्ये एकुण 15 प्रा.आ.केंद्र पुरस्कारास पात्र ठरले आहेत.सन 2022-23 मध्ये आरोग्य संस्थेमध्ये वाढ होण्यास प्रयत्न करण्यात येत आहे.जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णालय गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा सामान्य रुग्णालय,महिला व बाल रुग्णालय गडचिरोली व उपजिल्हा रुग्णालय अहेरी,आरमोरी व कुरखेडा तसेच ग्रामीण रुग्णालय चामोर्शी,धानोरा,एटापली व कोरची अशा एकुण 9 आरोग्य संस्था सन 2021-22 मध्ये पुरस्कारास पात्र ठरले आहेत.सन 2022-23 मध्ये आरोग्य संस्थाना सुध्दा पुरस्कार मिळण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here