गॅसची प्रतीक्षा; डोंगरे एचपी गॅस एजन्सीच्या कारभारामुळे नागरिक संतप्त

57

गॅसची प्रतीक्षा; डोंगरे एचपी गॅस एजन्सीच्या कारभारामुळे नागरिक संतप्त

बुकिंग वेळेवर, पण सिलिंडर कुठे?” — एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे ग्राहकांचा संताप वाढला

जिला प्रतिनिधी

गडचिरोली :- डोंगरे एचपी गॅस एजन्सीच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, गॅस सिलिंडरची बुकिंग करूनही महिनाभर उलटल्यानंतर सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक कुटुंबांवर संकट ओढवले आहे.
ग्राहकांनी वेळेवर बुकिंग करूनही सिलिंडरचा पत्ता नसल्याने नागरिकांना वारंवार एजन्सीच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारावे लागत आहेत. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे एजन्सीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी डोंगरे एचपी गॅस एजन्सीचे अधिकृत विक्रेते श्री. डोंगरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गॅस तुटवड्याचे नेमके कारण काय, याबाबत संभ्रम कायम आहे.
एकीकडे नागरिक स्वयंपाकासाठी गॅसअभावी हालअपेष्टा सहन करत असताना, दुसरीकडे एजन्सीकडून कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here