नागरिकांना मिळणार सातबारा, मिळकतपत्रिका, रंगीत नकाशा यांसारख्या सेवा एका ठिकाणी,जलद सेवा पुरविण्यासाठी प्रभावी पाऊल – सुनील सूर्यवंशी

96

गडचिरोलीत अत्याधुनिक संगणकीकृत भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन

नागरिकांना मिळणार सातबारा, मिळकतपत्रिका, रंगीत नकाशा यांसारख्या सेवा एका ठिकाणी,जलद सेवा पुरविण्यासाठी प्रभावी पाऊल – सुनील सूर्यवंशी

गडचिरोली दि. 4 एप्रिल – उपअधीक्षक भूमी अभिलेख, गडचिरोली यांच्या कार्यालयात सेतु केंद्राच्या धर्तीवर अत्याधुनिक संगणकीकृत भूप्रणाम केंद्राची स्थापना करण्यात आली असून, या केंद्राचे उद्घाटन आज निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुनील सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

या केंद्रामार्फत नागरिकांना मिळकत पत्रिका, सातबारा उतारा, रंगीत नकाशा तसेच अन्य आवश्यक अभिलेख शासकीय शुल्क भरून एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांत चकरा मारण्याची गरज भासणार नाही आणि त्यांच्या वेळेची बचत होईल. भूप्रणाम केंद्रामुळे शासकीय सेवा नागरिकांच्या अधिक जवळ गेल्या आहेत. हे केंद्र नागरिकांसाठी पारदर्शक व जलद सेवा पुरविण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरेल असे श्री सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले

याप्रसंगी मौजा चुरमुरा येथील मनोहर नानाजी राऊत आणि रत्नमाला पत्रु लोणारे यांना स्वामित्व योजनेअंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात सनद वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला अधिक्षक भूमी अभिलेख च्या अधिक्षक नंदा आंबेकर, उपअधिक्षक योगेश कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here